सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी हे बँकेचा कणा आहेत,ते समाधानी असावेत म्हणून हा अमृततुल्य करार:पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग बँकेच्या ४४४ कर्मचाऱ्यांना होणार कराराचा फायदा: १ कोटी ६५ लाख ४४ हजाराची वेतन वाढ

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी हेच खऱ्या अर्थाने बँकेचा कणा आहेत. जिल्हा बँकेशी त्यांची चांगली नाळ जुळलेली आहे. जेव्हा ते या बँकेत आनंदाने व समाधानाने एक काम करतील तेव्हाच ही सिंधुदुर्ग बँक आणखी मोठी होईल. देशात व राज्यात आता स्थिर सरकार असून अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद व सामंजस्याने बँकेने केलेल्या या करारातून चांगले प्रतिबिंब दिसेल, असे प्रतिपादन राजाचे मत्स्य व बंदर विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बँकेचे संचालक नितेश राणे यांनी केले. को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन चे राज्य अध्यक्ष आनंदराव अडसूळ सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सह्या करत बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा वेतन करार पूर्ण झाला! या बँकेच्या ४४४ अधिकारी कर्मचाऱ्यांना मागील वेतन फरकासह लाभ मिळणार आहे! व वार्षिक १ कोटी ६५ लाख ४४ हजाराची वेतन वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढी सेवा सुविधा सवलती याबाबत बँकेने कर्मचारी युनियनशी नवा करार करावा अशी मागणी होती. याबाबत मंत्री नितेश राणे यांनी लक्ष घातले. राज्याचे बँक युनियन अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी पुढाकार घेतला वा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या वेतन कराराला प्रतिसाद दिला व शुक्रवारी बँकेच्या प्रधान कार्यालयात मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी .युनियन अध्यक्ष आनंदराव अडसूळ यानी सह्या केल्या. यावेळी बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे सर्वा अधिकारी, एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page