रूपेश कानडे यांच्या माध्यमातून सलग आठ वर्षे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा केंद्रावर प्रवासाची सोय..

कुडाळ प्रतिनिधी
रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सलग ८ व्या वर्षी आपल्या तेर्सेबांबर्डे गावातील ई. दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये जा करण्याकरता मोफत वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. यावर्षी सुद्धा दिनांक अकरा फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या बारावी बोर्ड परीक्षे करिता गावातील विद्यार्थ्यांसाठी तसेच आज पासून सुरु होणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षा गावातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण परीक्षा कालावधीसाठी परीक्षा केंद्रावर ये-जा करण्या करिता मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली दहावी बोर्ड परीक्षे करिता उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संपूर्ण परीक्षा कालावधीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी भाजप कुडाळ मंडल तालुकाध्यक्ष श्री रुपेश कानडे, तेर्सेबांबर्डे सरपंच श्री रामचंद्र परब, ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र मेस्त्री, श्री गुणाजी जाधव, श्री संतोष डिचोलकर, श्री अजय डिचोलकर, सौ. प्रणाली साटेलकर पोलीस पाटील श्री रमाकांत जाधव तसेच पालक/ग्रामस्थ श्री. जायबा फाटक, श्री. संतोष पवार, श्री प्रदीप साटेलकर, श्री. राजन गवस, श्री. तुकाराम सडेकर, सौ. विद्या संजय परब, श्री. वामन बांबर्डेकर, श्री. दाजी बगळे श्री निलेश डगरे, श्री उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page