व्हाइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून गौरव

सावंतवाडी प्रतिनिधी
पत्रकार प्रा. रुपेश पाटील यांची ‘व्हॉईस ऑफ मिडियाचे’ जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील यांचा स्नेह सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्य मंगल कामत, मोहन जाधव, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पत्रकार राजेश नाईक, शैलेश मयेकर, संजय पिळणकर तसेच पत्रकार नरेंद्र देशपांडे, प्रसन्न गोंदावळे, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक,
दिव्या वायंगणकर, विद्या विकास संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत, सचिव तथा माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, संचालक अजय कोठावळे, सचिन दळवी, विकास केरकर, मयूर चराठकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश गवस, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष बंड्या हळदणकर, सचिन सावंत, मुख्याध्यापिका सुविधा केरकर, उपमुख्याध्यापक संजय शेवाळे, सहाय्यक शिक्षक दिगंबर मोर्ये, सचिन पालकर, विनोद चव्हाण, चंद्रलेखा परब, तसेच स्पर्धेचे परीक्षक श्रीमती गौरवी पेडणेकर, श्री. गुरूंनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडीतील पत्रकार बांधवांकडूनही सत्कार.!

दरम्यान प्राध्यापक रुपेश पाटील यांच्या या निवडीबद्दल सावंतवाडी येथील पत्रकार बांधवांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ पत्रकार सचिन रेडकर, शैलेश मयेकर, आनंद धोंड, विनायक गांवस, प्रसन्ना गोंदावळे, रूपेश हिराप,

सिल्लेश सावंत साबाजी परब शभम धुरि आदी पत्रकार उपस्थित होते
حد

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page