दोडामार्ग मराठा व्यापारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी सुदेश मळीक तर सचिव पदी प्रदीप गावडे यांची निवड

दोडामार्ग प्रतिनिधी
मराठा व्यापारी संघटना दोडामार्ग अध्यक्षपदी सुदेश मळीक यांची निवड करण्यात आली. मराठा व्यापारी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी व प्रगतीसाठी मराठा व्यापारी संघटना दोडामार्ग स्थापन करण्यात आली.
मराठा व्यापारी संघटना कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष पदी दोडामार्ग शहरातील सुदेश मळीक, उपाध्यक्ष तानाजी डांगी व पंकज मळीक, सचिव – प्रदीप गावडे सहसचिव – प्रसाद रेडकर, खजिनदार – सुशांत गवस, सहखजिनदार- समीर रेडकर, सदस्य – बाबली डावरे, संदीप घाडी, वैभव इनामदार, सौ.आचल सुशांत गवस, भूषण सावंत, उदय पास्ते यांची निवड करण्यात आली.
यावे मराठा महासंघाचे उपजिल्हाध्यक्ष एडवोकेट सोनू गवस, व्यापारी गोपाळ माजिक, श्रीपाद गवस, मनोज परब आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत आगामी काळात मराठा व्यापारी बांधवांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार असून मराठा बांधवांच्या हितासाठी संघटना कार्यरत राहणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील मराठा बांधवांना एकत्रित घेऊन उपक्रम राबवणार असे मत अध्यक्ष सुदेश मळीक यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page