सावंतवाडीत १४ एप्रिलला सिंधु आयडाॅल गायन व भिम आविष्कार नृत्य स्पर्धा

*🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४
व्या जयंतीनिमित्त येथील भिमगर्जना बौध्द मंडळ व समाजमंदिर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र व गोवा राज्य मर्यादित खुली भव्य सिंधु आयडॉल गायन व भिम आविष्कार नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ एप्रिलला येथील समाज मंदिर, खासकीलवाडा येथे होणार आहे.

या स्पर्धेकरिता प्रवेश फ्री असून दोन्ही स्पर्धेचे प्रथम बक्षिस रोख रक्कम १० हजार, व्दितीय ७ हजार व तृतीय ५ हजार व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षीस रोख रक्कम १ हजार ५०० असे ठेवण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत जास्तीस-जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन भिमगर्जना बौध्द मंडळ व समाजमंदिर मित्रमंडळाच्या करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी राहुल कदम ९३७१०११८२७, रुपेश जाधव ८८०५६९३८९३ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page