बांदा प्रतिनिधी
सिद्धिविनायक कला क्रीडा व महिला मंडळ शितलवाडी, पाडलोस यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 25 व 26 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार 25 रोजी सकाळी 10 वा. प्रतिमेचे पूजन व बुद्धवंदना,10.30 वा.स्वागत व परिचय,10.45 वा.स्वागत गीत, 11 वा. मान्यवरांची भाषणे,दुपारी 12 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक,दुपारी 2.30 ते संध्या. 6.30 वाजेपर्यंत महिलांचे व मुलांचे विविध खेळ,तसेच रात्री 9 वा.बापू गोपाळ गुंडू लिखित दोन अंकी मालवणी विनोदी नाटक ‘सोडला तर पळता’ सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरज साठे व पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार 26 रोजी रात्री 8 वा. जल्लोष भिमाचा कार्यक्रम होणार आहे.सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धिविनायक कला क्रीडा व महिला मंडळ शितलवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
