सावंतवाडी प्रतिनिधी
भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गेले महिनाभर रडतखडत सुरू असलेले गटार काम तत्काळ सुरू करण्यासाठी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली व कुणाल शृंगारे यांच्या सह नागरिकांनी नगरपरिषद अधिकारी व संबंधित ठेकेरादाला जाब विचारला.
दरम्यान आज रात्रीपासून काम सुरू करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या कामाच्या जागेत असलेले दोन गंजलेले वीज पोल एका दिवसात बदलून देण्याचे आश्वासन वीज महावितरण कंपनीचे उप अभियंता शैलेश राक्षे यांनी दिले त्यांनी यावेळी घटनास्थळाला भेट देऊन भाजपाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर दिलीप भालेकर बंड्या भिसे
प्रथमेश पेडणकर विजय सावंत विजय मुद्राळे हर्ष पेडणेकर गौरव रामाने मुन्ना तूयेकर बंड्या परब संतोष खंदारे संदेश मोर्ये नंदू खंदारे, साईराज सुभेदार, भरत परब, प्रसाद परब आदी उपस्थित टोने
