कुडाळ प्रतिनिधी
श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे यात्रे निमित्ताने शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी तर माणगाव खोरे मर्यादित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत दिक्षा चोडणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे यात्रे निमित्ताने जिल्हास्तरीय खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स व माणगाव खोरे मर्यादित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेत दोन्ही गटामध्ये ४६ स्पर्धेकांनी आपले सादरीकरण केले. यामध्ये जिल्हास्तरीय खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ गवंडी, द्वितीय क्रमांक दुर्वा पावसकर, तृतीय क्रमांक पूर्वा मेस्त्री यांनी पटकावला तर माणगाव खोरे मर्यादित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक दिक्षा चोडणकर, द्वितीय क्रमांक जान्हवी परब, तृतीय क्रमांक गार्गी दशरथ तेली यांनी पटकावला.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून समिल नाईक, समृद्धी पेडणेकर व नेहा जाधव यांनी काम पहिले.
शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी व दिक्षा चोडणकर प्रथम
