कुडाळ प्रतिनिधी
खून करणे,सरकारी नोकराला मारहाण करणे,मालमत्तेचे नुकसान करणे, दारू वाहतूक करणे, जुगार चालवणे ,लोकांना धमकावणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेला येथील संशयित सिद्धेश अशोक शिरसाट याला दोन वर्षाकरिता सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर मधून हद्दपार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तो निवती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या ठिकाणी बाहेर येतात त्याच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कुडाळ पोलिसांकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवू नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे, या करीता तात्कालीन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे, पोलीस अंमलदार, प्रितम कदम, कृष्णा केसरकर, संजय कदम, रुपेश सारंग, उषा आईर यांनी केलेली आहे. यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्याच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना दिलेले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलित केली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील सिध्देश अशोक शिरसाट (वय ४३ वर्षे, रा. कुडाळ बाजारपेठ, ता. कुडाळ) याच्याविरुध्द खून, सरकारी नोकरास मारहाण, मालमत्तेचे नुकसान करणे, दारु वाहतूक करणे, जुगार चालवणे, लोकांना धमकावणे यासारखे गंभीर गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याची माहीती उपलब्ध झाल्याने
त्याचेविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्याकरीता अहवाल उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचेकडे पाठविण्यात आलेला होता. त्यानुसार त्याला हददपारीचे प्रकरणाची सुनावणी उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांनी घेवून त्यात वरील नमुद सराईत गुन्हेगार यास दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.
वरील गुन्हेगार हा सध्या निवती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी येथील कारागृहामध्ये आहे. तो न्यायालयीन कोठडीतून बाहेर येताच त्यास सदर हद्दपारीचे आदेशाची त्वरीत बजावणी करुन उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचे आदेशान्वये त्यास सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याची कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्याकडून करण्यात येणार आहे. भविष्यात सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन अशा गुन्हेगारांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याची
