महाशिवरात्री रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम तर यश जाधव व्दितीय,मालवणी मुलगा तृतिय

आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे दिनेश गावडे यांनी आयोजित केली होती स्पर्धा

सावंतवाडी प्रतिनिधी
आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी महाशिवरात्री निमित्त हिरण्यकेशी मंदिराची रील स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेत सावंतवाडी येथील व सध्या डि वाय पाटील मेडीकल कॉलेज चा प्रथम वर्षाला शिकणारा विद्यार्थी साईश गावडे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे, तर व्दितीय क्रमांक यश जाधव २२ तृतिय क्रमांक मालवणी मुलगा ०७ यांनी मिळविला आहे.
आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी महाशिवरात्री निमित्त हिरण्यकेशी मंदिराची रील स्पर्धा आयोजित केली होती,या स्पर्धेत चाळीस रील स्टार नी भाग घेतला होता.पाच उत्तेजनार्थ मध्ये गिरीश गावडे,कोकणचा ओंकार,आंबोली हिल्स सिध्देश घोगळे,व डीपी ६५५७ यांना देण्यात आला आहे.या सर्व रील चे स्परीक्षण सिध्देस सावंत यांनी केले.सर्व यशस्वी स्पर्धकांचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे व आयोजकांनी अभिनंदन केले असून लवकरच बक्षीस वितरण ची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page