स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात आणि शेतीची नासधूस करणा-या गव्या रेंड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी १० जुलै सकाळी ११ वाजता हुमरमळा येथे बैठक आयोजित

कुडाळ प्रतिनिधी
सध्या स्मार्ट मिटर गुपचूप बसवून भरमसाठ बिले ग्राहकांना येत आहेत यामुळे विज ग्राहकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असुन हे स्मार्ट मिटर काढुन टाकुन आमचे जुनेच मिटर बसवावेत या मागणीसाठी विचार विनिमय करण्यासाठी माड्याची वाडी, पाट, आंदुर्ले, हुमरमळा या गावातील विज ग्राहकांची बैठक आणि हुमरमळा वालावल गावातील तसेच चेंदवण पडोसवाडी येथील शेतक-यांची शेती गव्या रेड्यांनी नासधूस केली या वर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी माजी पंचायत समितीचे सदस्य श्री अतुल बंगे, हुमरमळा वालावल सरपंच श्री अमृत देसाई यांच्या उपस्थितीत हुमरमळा वालावल श्री रामेश्वर मंगल कार्यालय (प्रविण मार्गि) यांच्या हाॅल वर सभेचे आयोजन १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे तरी या सभेस विज ग्राहक आणि शेती नुकसान झालेल्या शेतकरी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पाट येथील विज ग्राहक प्रथमेश परब व हुमरमळा वालावल करमळीवाडी येथील शेतकरी किशोर वालावलकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page