किडनिच्या आजाराने त्रस्त असलेल्या सुनेश गवस यांना आर्थिक मदत.

भाजप युवा नेते विशाल परब यांनी केली मदत

भाजपचे युवा नेते विशाल परब हे राजकारणा सोबत समाजकारणात नेहमी अग्रेसर असतात. गरजूंना मदत करणे हे त्यांचे जणू ब्रिद वाक्य आहे. झोळंबे येथील सुनेश गवस हे किडनिच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना आर्थिक मदतीचा हात देत सहकार्य केले आहे.विशाल परब यांच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस व शिरिष नाईक यांनी ही रक्कम त्यांच्या कुटुंबियांना दिली आहे.

यावेळी त्यांच्या सोबत महेश गवस, सुहास दळवी, मंगेश नाटेकर, रितेश गवस, संजू उसपकर, नाना देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

झोळंबे येथील सुनेश उदय गवस सध्या किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर गोवा विजन येथे उपचार सुरू आहेत व डॉक्टरांनी पुढील शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 12 ते 14 लाख सारख्यामोठ्या खर्चाची गरज असल्याचे सांगितले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आवश्यक खर्च भागवणे शक्य होत नाही.

या कठीण प्रसंगात तुमची थोडीशी मदतही सुनेश उदय गवस यांच्या जीवनासाठी मोठा आधार ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page