कुडाळ प्रतिनिधी
शहरातील कुशल कारागीर सिद्धेश नाईक यांनी श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागणाऱ्या सागवानी रथाचे काम पाच नोव्हेंबर रोजी पूर्ण करून विठ्ठल रखुमाई चरणी अर्पण केले
सदर रथ संपूर्ण सागवानी असून सुमारे दीडशे वर्षापूर्वीचा सागवान वृक्ष वापरण्यात आला आहे. साधारण 2019 मध्ये मुख्य गाभाऱ्यातील ऋग्वेद या वेद ग्रंथाच्या लाकडीपेटीचे काम देखील सिद्धेश नाईक यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले होते
सदर रथाची लांबी 15फूट, रुंदी 6.5 फूट व उंची 15 फूट असून रथाचा प्रवास बैल जोडीने होईल संपूर्ण रथाचे वजन दोन टन आहे आणि विशेष म्हणजे विठ्ठल मंदिरा समितीचा हा पहिलाच रथ आहे व या रथाचे काम कुडाळचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांनी केले हे विशेष
सदर रथाच्या खांबावर जय विजय ची मूर्ती आहे व रथाच्या वरील बाजूस गरुड हनुमंत आहेत रथाला आठ खांब असून तीन कळस आहेत ही विशेष कामगिरी करणारे सिद्धेश नाईक हे कुडाळ चे सुपुत्र असल्याने त्यांचा सन्मान नगरसेवक मंदार शिरसाठ, सुशील चिंदरकर, नितीन सावंत व अमित राणे यांनी कुडाळ शिवसेना युवा सेनेच्या वतीने करण्यात आला
कुडाळ शहराचे नाव उज्वल करणाऱ्या सिद्धेश नाईक याचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
