विकासाची ब्लू प्रिंट तयार, विकास आराखडा घेऊनच जनतेसमोर
सावंतवाडी प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतसे राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत निवडणुकीच्या या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा साक्षी वंजारी या सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी कंबर कसली आहे. अद्याप अर्ज दाखल केला नसला तरी डोअर टू डोअर प्रचाराला मात्र सुरुवात केली आहे विकासाचा आराखडा तयार असून विकासाची ब्लू प्रिंट घेऊनच जनतेसमोर जाणार. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेला थेट संपर्क यामुळे आपल्याला निवडणुकीचे तिकीट मिळणार याची खात्री आहे गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि सावंतवाडी च्या राजकारणात समाजकारणात लोकांच्या अडीअडचणीत सक्रिय सहभागी असलेल्या साक्षी वंजारी यांना मतदारांची साथ चांगलीच मिळत आहे साक्षी वंजारी यांसारख्या सुशिक्षित राजकीय अनुभव असलेल्या महिला या सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यास सावंतवाडी शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे साक्षी वंजारी यांनी सावंतवाडीतील वेगवेगळ्या प्रभागामध्ये आपला प्रचार पूर्ण केल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत जरी महाविकास आघाडीची साथ मिळाली नाही तरी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर स्वबळावर लढण्यास त्या सज्ज आहेत शहराचा विकास हेच ध्येय घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या साक्षी वंजारी यांना काँग्रेस पक्षाची मात्र वरिष्ठ पातळीवरून साथ मिळत आहे “आता नाही तर कधीच नाही” या भूमिकेतून त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांची उमेदवारी सावंतवाडीकर जनतेला एक नवा राजकीय पर्याय असल्याचे बोलले जात आहे अर्ज भरून प्रचाराची सुरुवात करण्याच्या पारंपारिक पद्धतीला बगल देत आधी लोकांपर्यंत जाऊन संवाद साधत आपल्या विकासाचं विजन लोकांसमोर मांडत आहेत केवळ मला सत्ता नको आहे तर सावंतवाडीकर जनतेचे प्रश्न, सावंतवाडी शहराचा विकास, आणि राज्यातील एक आदर्शवत शहर बनवायचं हे आपले व्हिजन घेऊन त्या निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत.
सावंतवाडीकर जनता एका नव्या नेतृत्वाला स्वीकारून एक आदर्शवत शहर बनवण्यासाठी व शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चित मला साथ देतील विरोधी पक्षच्या माध्यमातून माझ्या रुपयाने शहराचा खुंटलेला विकास पुन्हा मार्गी लागेल. व्हिजन आणि धडाडी नेतृत्व असलेला नगराध्यक्ष सावंतवाडी शहराला माझ्या रूपाने मिळू शकेल असा ठाम विश्वास साक्षी वंजारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत हे निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
