हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीने प्रत्येक बस थांब्याजवळ बैठक व्यवस्था;सरपंच अमृत देसाई

कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल गावातील बस थांब्याजवळ समोरच्या बाजुला बैठक व्यवस्था अतुल बंगे आणि सरपंच अमृत देसाई उपसरपंच सौ रश्मी वालावलकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असल्याने वयोवृद्ध ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत
हुमरमळा वालावल परकरवाडी येथे ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी हेमंत कद्रेकर यांनी सुचना केली होती तर हुमरमळा वालावल बाजारपेठ मध्ये ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर यांनी सुचवले होते तर बांधलेला आंबा आणि हेळोबा देवस्थान कडे उपसरपंच सौ रश्मी वालावलकर व ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर यांनी सुचविलेवरुन बसविण्यात आले आहेत
या बैठक व्यवस्था झाल्याने शाळकरी विद्यार्थी व वयोवृद्ध ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हुमरमळा वालावल यांचे आभार मानले असुन ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील यांनी वेळेवर मागणी करुन ही व्यवस्था केल्या बद्दल महीला वर्गांनी विशेष आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page