कुडाळ माड्याचीवाडी-रायवाडी येथे मिक्सर ट्रक पलटी होऊन चालक जखमी

कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील माड्याचीवाडी-रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा भाग खचल्याने हा मिक्सर ट्रक कॉलवेलगत खाली पलटी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकला होता. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत चालकाला बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page