भाजपचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव
माजी आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा
कणकवली प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाच्या निवडण्यासाठी विशेष सभा आज नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या वतीने सुशांत नाईक तर भाजपच्या वतीने राकेश राणे असे दोन अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अतिरिक्त कास्टिंग मतामुळे सुशांत नाईक यांचा एक मताने विजय झाला आहे.
कणकवली नगरपंचायत महाराज सभागृह नगरपंचायत पहिली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील उपस्थित होत्या. उपनगराध्यक्ष पदासाठी हात वर करुन मतदान घेण्यात आले. त्यात भाजपचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश बळीराम राणे यांना ९ मते तर सुशांत श्रीधर नाईक यांना ९ मते अशी समसमान मतदान झाले. अखेर दोन्ही उमेदवार यांना समान मतदान झाल्यानंतर सभेचे अध्यक्ष नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर होते त्यांना अतिरिक्त मतांचा अधिकार असल्यामुळे त्यांचे मत सुशांत नाईक यांना आल्यामुळे एका मतांनी सुशांत नाईक यांचा विजय झाला.
या सभेला भाजपचे राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, स्वप्निल राणे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, संजय कामतेकर आदी नगरसेवक उपस्थित होते. तर शहर विकास आघाडीचे गटनेते रुपेश नार्वेकर, जाई मूरकर, सुमेधा अंधारी, लूकेश कांबळे, दीपिका जाधव, जयेश धुमाळे, संकेत नाईक, सुशांत नाईक हे नगरसेवक उपस्थित होते.
