कुडाळ (गोठोस)
गोठोस गावच्या वतीने गोठोस विठ्ठल मंदिर येथे घावनळे जिल्हा परिषद व गोठोस पंचायत समिती तसेच घावनळे पंचायत समिती मतदारसंघातील विजयी सदस्यांचा प्रकाश मोर्ये मित्र मंडळ च्या वतीने उपस्थितीत विजयी सदस्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,माजी ग्रामपंचायत सदस्य रविकांत राऊळ,आबा निचम,भरत सावंत,भाई घाडी,दिपक खरात,दादा राऊळ, कृष्णा गोठोस्कर, सहदेव नाईक,विनायक बांदेकर,शंकर तामणेकर, तलाठी संतोष बांदेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी प्रकाश मोर्ये यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करा.घावनळे जिल्हा परिषद मतदार संघात शासन दरबारी जनतेच्या गरजा समजून जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे करणे.आमचे सदैव आपणांस सहकार्य लाभेल असे श्री.मोर्ये यांनी सांगितले.
