हुमरमळा वालावल येथील श्रीम लिनता लवु परकर यांना पेन्शन योजना मंजुर!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात मंजुरी पत्र,
नायब तहसीलदार संजय गवस यांनी दीले मंजुरीचे पत्र!

कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल येथील संजय गांधी निराधार समीती कडुन मंजुर लाभार्थी श्रीम लिनता लवु परकर या लाभार्थींना मंजुरीचे पत्र नायब तहसीलदार श्री संजय गवस यांनी आज दीले
छत्रपती शिवाजी महाराज राजस्वअभियान सध्या सुरू असुन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ कार्यालयात विविध प्रकारच्या दाखले तसेच उत्पन्न दाखले तसेच संजय गांधी निराधार समीती प्रकरणे या कामांना या अभियानाच्या माध्यमातून गती मिळाली आहे आणि कुडाळ तालुक्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी जोमाने काम करीत असुन आज याच अभियानाचा फायदा हुमरमळा वालावल गावातील श्रीम लिनता लवु परकर या लाभार्थी यांना मिळवुन देण्यासाठी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी प्रयत्न केले ते मंजुर पत्र आज नायब तहसीलदार श्री संजय गवस यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी श्री अतुल बंगे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page