भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते भाजपा कार्यकर्त्यांना ध्वजवाटप!
सावंतवाडी प्रतिनिधी
६ एप्रिल २०२६ रोजी होत असलेला भाजपाचा स्थापना दिन हा कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचा सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरत आहे. आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन देशाच्या कानाकोपऱ्यात उत्साहात साजरा होणार आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून उद्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या घरावर,मंडल,बूथ आणि शक्ति केंद्र कार्यालयांवर हजारोंच्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे ध्वज फडकवले जाणार आहेत.
भाजपा स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला आज सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशाल परब यांच्या माध्यमातून “भाजपा ध्वज वाटप अभियान” जोरदारपणे राबवण्यात येत आहे. श्री विशालची परब यांच्या शुभहस्ते भाजपा कार्यकर्त्यांना आज भाजपाच्या ध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.
उद्या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हजारो घरांवर भाजपाचे ध्वज फडकत वातावरण भाजपामय होणार असल्याच्या भावना श्री विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केल्या. उद्या होणाऱ्या भाजपा स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचा उत्साह आजच्या ध्वज वाटप कार्यक्रमात स्पष्टपणे दिसून येत होता.
