कु.अस्मिता पांडुरंग पोवार ची पोलिस दलात भरारी!

गोठोस गावच्या वतीने करण्यात आला गौरव.!

कुडाळ (गोठोस)
तालुक्यातील गोठोस गावचे रहिवासी पांडुरंग पोवार यांची मुलगी अस्मिता हीची महाराष्ट्र पोलीस भरती पुणे शहर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून गोठोस येथे गुरुवारी ९ एप्रिल रोजी सहकुटुंब तिचा व कुटुंबियांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला

गोठोस गावातील सर्वसामान्य कुटुंबातील अस्मिऊ हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. शारीरिक तंदुरुस्ती, नियमित अभ्यास तसेच लेखी परीक्षेची काटेकोर तयारी करत तिने पोलीस भरती प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवर यशस्वीपणे मात केली. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात गोठोस गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यावेळी गोठोस गावचे ग्राम महसूल अधिकारी संतोष बांदेकर म्हणाले की,अस्मिता पोवार हिने शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा आणि मुलाखती अशा सर्व टप्प्यांवर यशस्वी वाटचाल करून ग्रामीण भागातील मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे तिच्या यशातून स्पष्ट झाले आहे. तिच्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे. असल्याचे ते म्हणाले. तर सत्कारमूर्ती अस्मिता पांडुरंग पोवार हिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबातील सदस्यांना देत त्यांच्या मोलाच्या साथीमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच सूरज कदम,माजी सैनिक सुभाष कदम,माजी सरपंच एकनाथ मेस्त्री,भाई घाडी,सुहास सावंत, प्रभाकर गोठोस्कर,शिक्षक विलास गोठोस्कर,शिक्षक श्री.तावडे, विष्णू तामणेकर,प्रदीप घाडी,पोलीस पाटील श्री.शिंदे,कृषी सहाय्यक धनंजय कदम,आदी महिला वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page