काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री शिवाजी वाचन मंदिर, काळसे यांचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी)
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक
मंडळ आणि श्री शिवाजी वाचन मंदिर, काळसे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक. 24 मे रोजी सकाळी 8:00 वाजता केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर, मुंबई, भारत सरकार चे वरिष्ठ अनुवाद अधिकारी तथा प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी असणारी भीती दूर व्हावी आणि जिल्ह्यातून प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत या उद्देशाने या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. काळसे धामापूर गावासह मालवण तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी आणि शिवाजी वाचन मंदिर काळसे चे अध्यक्ष केशव सावंत यांनी केले आहे.
