जमिन मालकांच्या परवानगीशिवाय कुडाळ नगरपंचायतीने आमच्या खाजगी जमिनीत रस्ता करू नये; जमीन मालक दत्तात्रय राजाध्यक्ष

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायत ही आमच्या सामाईक खाजगी जमीनीतून अपिल जिल्हा न्यायालयात चालू असताना जबरदस्तीने पोलीस संरक्षण घेऊन रस्ता करणार असल्याचे निदर्शनास आले आहे.या रस्त्याला जमीन मालकांचा विरोध आहे.सदर अपिलाची तारीख 11 जून 2026 रोजी असल्याने नगरपंचायतीने आमच्या परवानगीशिवाय रस्ता करू नये, असे जमीन मालक दत्तात्रय राजाध्यक्ष यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आपला विरोध असल्याचे लिहून दिले आहे.असे त्यांनी सांगितले.

गाव मौजे कुडाळ, तालुका कुडाळ येथील सर्व्हे नंबर 212 हिस्सा नंबर 1ब/4 ही मिळकत श्री दत्तात्रय राजाध्यक्ष,श्रीमती शीतल आरोसकर आणि अन्य भावंडांची सामाईक मिळकत आहे. व या मिळकतीतून रस्ता करू नये अशी कुडाळ नगरपंचायतीला कायमची ताकीद होण्याकरिता दत्तात्रय राजाध्यक्ष,श्रीमती शीतल आरोसकर यांनी जिल्हा न्यायालयात नियमित दिवाणी अपील क्रमांक १९/२०२६ दाखल केलेले असून त्यातील ताकीद अर्जाची सुनावणी दिनांक 11 जून 2026 रोजी होणार आहे.अशा प्रकारे जिल्हा न्यायालयात अपील प्रलंबित असतानाही कुडाळ नगरपंचायत सदर खाजगी मिळकतीतून जबरदस्तीने ,बेकायदेशीररीत्या व पोलिस संरक्षणात दिनांक 25/05/2026 रोजी रस्ता करणार असल्याचे समजते. याला सदर जमीन मालकांचा विरोध आहे. कुडाळ नगरपंचायत दबावतंत्र वापरून आम्हाला न विचारता रस्ता काढत आहे.असे राजाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

सदर जमीन मालक हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना नाहक त्रास देण्याचा हा नगरपंचायतीचा उद्देश आहे. कुडाळ पोलिसांना दत्तात्रय राजाध्यक्ष यांनी जबाब देऊन रस्ता करण्यास आपला विरोध असल्याचे लिहून दिले आहे.असे राजाध्यक्ष यांनी सांगितले.तसेच जिल्हा न्यायालयात लवकरच ताकीद अर्जावर सुनावणी होणार असतानाही कुडाळ नगरपंचायत अतिशय जबरदस्तीने आणि आताताईपणे रस्ता करण्याचे योजित आहेत.तरी आमच्या परवानगीशिवाय नगरपंचायतीने रस्ता करू नये असेही जमीन मालक दत्तात्रय राजाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page