माड्याची वाडीत महंत गावडे काका महाराजांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित योगशाळ्यामध्ये योगा करण्यात आली
या योग दिनाच्या कार्यक्रमात महंत गावडे काका महाराज यांच्या अमोघ वाणीतून योग आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन मिळाले आजपर्यंत गावडे काका व त्यांच्या फक्त सेवान्यास यांच्यामार्फत 100 हून अधिक योगशिक्षक समाजाला दिले असून ते आपले कर्तव्य बजावत आहेत.
आंतरराष्ट्रीय योगा दिवस सुरू होण्या अगोदर तीन वर्ष काकांच्या माध्यमातून दर वर्षी 21 जूनला योगा वर्ग घेतला जात होता त्या दिवसाचे महत्त्व म्हणजे तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो योगायोग म्हणजे त्याच दिवसाला आंतरराष्ट्रीय योगा दिवस घोषित करण्यात आलेला आहे
या योगा दिवसाला श्री आनंद सावंत आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगशिक्षक यांनी योगासंदर्भात मार्गदर्शन केले
त्या योगा कार्यक्रमात श्री सुजय गावडे, सौ श्वेता कोरगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी भाजपा सिंधुदुर्ग, माजी सभापती कुडाळ पंचायत समिती तथा तालुकाध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बंड्या सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री राजू राऊळ, महिला जिल्हा सरचिटणीस सौ अदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा महिला तालुकाध्यक्ष कुडाळ सौ आरती पाटील, पंचायत समिती सदस्य श्री मंगेश प्रभू, नगरसेवक श्री उदय मांजरेकर, नगरसेविका सौ श्रेया गावंडे, माजी नगरसेवक श्री राजू गावंडे, तसेच भक्त सेवा न्यास माळ्याचीवाडी यांचे योगसाधक व योगशिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page