सापडलेली सोन्याची चैन प्रामाणिकपणे मालकाकडे सुपूर्त; पत्रकार रेवती वालावलकर यांचा पोलिसांकडून सन्मान

सावंतवाडी प्रतिनिधी

दि. 17 जून रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्यासुमारास विठ्ठल मंदिराजवळून मारुती मंदिराकडे जात असताना सोशल मीडिया पत्रकार रेवती बाळकृष्ण वालावलकर यांना एक सोन्याची चैन सापडली होती. सापडलेल्या चैनची माहिती घेतल्यानंतर ती श्री. जितेंद्र पांडुरंग गावकर (वेत्ये गावकरवाडी), पंचायत समिती सदस्य यांची असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवत सदर सोन्याची चैन आज दि. 23 जून रोजी श्री. गावकर यांच्या पत्नी सौ. जागृती जितेंद्र गावकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

या उल्लेखनीय व प्रामाणिक कार्याबद्दल सावंतवाडी पोलिस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक सौ. माधुरी मुळीक यांच्या हस्ते रेवती वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.

सापडलेली मौल्यवान वस्तू कोणताही मोह न बाळगता तिच्या मूळ मालकाकडे परत करून रेवती वालावलकर यांनी समाजासमोर प्रामाणिकतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून पोलिस प्रशासनानेही त्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page