भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वतीने मळेवाड,शिरोडा,रेडी,येथील लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप

“पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून जपत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी आज मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ व रेडी गणपती मंदिर अशा तीन ठिकाणी लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाच्या सरींमध्ये रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी ओळखून त्यांना दिलासा देण्याचा हा उपक्रम अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला.

पावसाळ्यात व्यापार सुरू ठेवण्यासाठी छत्री ही केवळ एक वस्तू नसून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला आधार देणारे संरक्षण कवच ठरते. हीच जाणीव ठेवून विशालजी परब यांनी व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आणि त्यांच्या संघर्षात खंबीरपणे सोबत उभे राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, डोळ्यासमोर कोणतीही निवडणूक नसताना केवळ सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अधिकच लक्षवेधी ठरला आहे. प्रसिद्धीपेक्षा समाजहिताला प्राधान्य देत केलेली ही मदत म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

“राजकारण केवळ सत्तेसाठी नसते, तर समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी असते,” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत व्यापाऱ्यांना आधाराची छत्री मिळाली आणि सेवाभावाच्या या कृतीने अनेकांच्या मनात आपलेपणाची ऊब निर्माण केली. त्यामुळे “पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” हे ब्रीदवाक्य आज केवळ शब्दांत नाही, तर कृतीतूनही सार्थ ठरल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यावेळी मळेवाड तिठा येथे महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्यासह सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनीलजी निरवडेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, जि. प. सदस्या सौ. अपर्णा सातोसकर, ओंकार प्रभू, माजी जि. प. सदस्य राजन मुळीक, विकास परब, केतन आजगांवकर, गिरिष परब, बंड्या दळवी, बंटी जामदार, विजू साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर तर रेडी येते सरपंच श्री रामसिंग उर्फ भाई राणे. उपसरपंच आनंद भिसे
ग्रामपंचायत सदस्य नमिता नागोलकर रश्मी रेडकर सागर रेडकर सामाजिक कार्यकर्ते सागर राणे दीपक राणे दिलीप राणे दर्शन कांबळी संजय कांबळी विनायक कांबळी शिरोडा बाजारपेठ येथे माजी सरपंच मनोज उगवेकर, लक्ष्मीकांत कर्पे, श्रीकांत राजाध्यक्ष तसेच नाईक,शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे,शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर,वेंगुर्ला तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी,शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,शिरोडा युवा नेतृत्व संतोष धानजी,शिरोडा भाजप पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,अशोक परब,बाबल गावडे,प्राजेश गावडे,दादा शेटये,बाळकृष्ण परब,दत्ताराम फटजी,विदयाधर धानजी,तुषार म्हाकले,दिपक नाटेकर,आरवली महिला पदाधिकारी रिमा मेस्त्री,आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव,आरवली सरपंच समीर कांबळी,आरवली ग्रामपंचायत सदस्य तातोबा कुडव त्याच प्रमाणे सदगुरु मलबारी,शिवा तारी,किरण तांडेल तसेच व्यापारी ,भाजप हिंतचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page