भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्याकडून नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्वागत

सावंतवाडी प्रतिनिधी
पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र
मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक आणि माजी नगरसेवक राजू बेग यांनीही नूतन पोलीस निरीक्षकांचे स्वागत केले.

सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखत नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भेटीदरम्यान शहरातील विविध प्रश्न, नागरिकांची सुरक्षितता आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त याबाबतही सविस्तर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page