जि.प. सदस्य रुपेश कानडे यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी
माणगाव प्रतिनिधी
माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश रजनी रविंद्र कानडे यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्वांत मोठ्या गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करणे आवश्यक असल्याचे कानडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील खालील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे
🔸झाराप तिठा उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रस्ते.
🔸MDR-43 बॉम्बे रेल्वे स्टेशन रस्ता, ०/०० ते ०/१५०० कि.मी.
🔸आकेरी-माणगाव रस्त्यावर बांधण्यात आलेल्या नवीन छोट्या पुलावरील खड्डे.
🔸आकेरी-माणगाव-शिवापूर रस्त्यावरील खड्डे.
या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर वाहतुकीची मोठी वर्दळ वाढणार असल्याने त्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
