कुडाळ (प्रतिनिधी)
वालावल पंचायत समिती मतदारसंघात नेरुर, वालावल, चेंदवण, कवठी या ग्रामपंचायत हद्दीत आजही मातीची घरे घरकुल च्या प्रतिक्षेत असुन तातडीने सर्व्हे होऊन या लाभार्थींना घरकुल मंजुरी द्यावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रविंद्र खेबुडकर यांच्या कडे पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे
यावेळी सौ बंगे यांनी म्हटले आहे की आजही आपल्या वालावल पंचायत समिती मतदार संघात मातीची घरे आहेत ती घरे अगदी कोसळण्याच्या अवस्थेत असुन अशा घरांचा तातडीने सर्व्हे होऊन या ख-या लाभार्थी यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी सौ बंगे यांनी करून जे लाभार्थी सकाळी उठुन आपल्या पोटापाण्यासाठी बाहेर पडुन संध्याकाळी आपल्या घरी येतात अशा लाभार्थ्यांना शासनाकडून काय मिळते याची कल्पना नसते म्हणुनच खास बाब म्हणून तातडीने सर्व्हे होऊन मातीची घरे घरकुल योजनेच्या योजनेत समाविष्ट करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली आहे
