मालवणमध्ये कथित सामाजिक बहिष्काराचा आरोप;पोलिसांकडे तक्रार,माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांची चौकशीची मागणी
मालवण प्रतिनिधी पिढ्यान्पिढ्या जपलेली नाती… सण-उत्सवांतून फुललेला आपलेपणा… सुख-दुःखात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गावची परंपरा… मात्र याच सामाजिक एकोप्याला तडा गेल्याचा खळबळजनक आरोप मालवण तालुक्यातील एका गावातून समोर आला आहे. ‘मांड’पासून सामाजिक व्यवहारापर्यंत आपल्या कुटुंबाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची दारे बंद करण्यात आली, असा गंभीर आरोप करीत संबंधित महिलेने…
