रविंद्र खेबुडकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती…
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आज उशिरा हे आदेश काढले. जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची शासनाने बदली केली होती. त्यांच्या जागी ३१ जानेवारी २०२४ रोजी शासनाने मकरंद देशमुख यांची नियुक्ती केली होती….
