येत्या महिन्याभराच्या आत ताज हॉटेलचा भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्धाटन…

मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

सावंतवाडी प्रतिनिधी
ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण झाला आहे आता लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताज हॉटेलचा भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्घाटन येत्या महिन्याभराच्या आत होणार आहेत या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन येणार आहेत अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ले येते हाऊस बोट स्कुबा डायव्हिंग. असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरु होणार आहेत असे ते यावेळी बोलताना म्हणाले. श्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केले होते यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की या मतदारसंघात वेगळी प्रवृत्ती येत आहे अशी प्रवृत्ती तुम्ही येऊ देणार आहात का जमीन मोजणीच्या वेळी बाऊन्सर घेऊन जाणे ही प्रवृत्ती घातक आहे कंत्राटदारांना धमकावणे अशी ही प्रवृत्ती तुमच्या घरापर्यंत येईल त्यामुळे वेळ पडल्यास अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी माझा लढा असेल आणि मी जनतेसोबत राहीन. असेही ते श्री केसरकर म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page