अखेर’ राजन तेलींचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश..

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
काही दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली असून माजी आमदार राजन तेली यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशनांतर माजी आ. राजन तेली यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले भाजपा पक्ष वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. कोणतेही वाद नाहीत. मात्र एक आमदार व एक मंत्री यांच्या त्रासाला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page