२७ जानेवारीला कुडाळ येथे सर्व पक्षीय बैठक घेऊन विज वितरणला निवेदन देणार!
कुडाळ प्रतिनिधी
स्मार्ट प्रिपेड च्या विरोधात संपूर्ण राज्यात संघर्ष होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये याची सुरुवात होऊन नुकतीच एक विज ग्राहकांची बैठक घेऊन आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली
कुडाळ येथील विज वितरण कर्मचारी सदन मध्ये विज ग्राहक राज्य समीती निमंत्रक काॅ संपद देसाई, सल्लागार अॅड संदीप निंबाळकर, अॅड नंदन वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली
राज्य सरकारने अदानी ग्रुपला महावितरण विकुन विज ग्राहकांचे कंबरडे मोडले असुन स्मार्ट प्रीपेड मिटर बसविण्याचे काम सध्या सुरू असुन फाॅलटी मिटर नविन बसवून देतो असे सांगून हे प्रिपेड मिटर बसविले जात आहेत ही विज ग्राहकांची फसवणूक केली जात असुन अदानींची कार्यालये सुरू झाली असुन आता राज्य सरकारने विज वितरण अदानी ला विकली आहे असे काॅ संपद देसाई यांनी सांगुन महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्य़ातील विज ग्राहक आंदोलने करीत असुन आपणही कुडाळ पासुन या आंदोलनाला सुरवात करुया असे आवाहन काॅ देसाई यांनी केले आहे
यावेळी अतुल बंगे, नंदन वेंगुर्लेकर, अॅड संदीप निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहक निमंत्रक म्हणून सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची निवड करण्यात आली तर सल्लागार अॅड संदीप निंबाळकर अॅड नंदन वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली सोमवार २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता कुडाळ एम आय डी सी शासकीय रेष्ट हाउस ला मा आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विज ग्राहकांची बैठक होऊन त्यानंतर अधिक्षक विज वितरण यांना निवेदन देण्यात येणार आहे
यावेळी विज वितरण ठेकेदार व मिटर रीडिंग घेणारे छोटे छोटे बेरोजगार उपस्थित होते
यावेळी विद्याधर कांबळी, प्रकाश मोरूसकर, बाळु जाधव, नारायण तळवडेकर, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते
