कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारीला बसल्याने पादचारी गंभीर जखमी कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारीला बसल्याने पादचारी गंभीर जखमी

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारी ला बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. सुभाष बाबू कुबल (वय ६७, रा. दाभोली-तेलीवाडी ता. वेंगुर्ला) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पोस्ट ऑफीस चौकात रस्ता ओलांडणारे पादचारी सुभाष कुबल यांना गोवा येथून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या डंपरची धडक बसली. यात कुबल यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानुसार डंपर चालक मेलवीन झुजे परेरा (वय ४३ रा. मडगाव गोवा) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर हवालदार पी.एन.बुथेलो यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page