अंगणवाडी सेविकांना दर महीना मिळणार प्रोत्साहन भत्ता

काय आहेत निकष? जाणून घ्या

मुंबई प्रतिनिधी
अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. भत्त्यासाठी सेविका आणि मदतनीस यांच्या एकत्रित कामाच्या निकषानुसार अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करून पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे हा यामागील हेतू आहे.

कसा असेल प्रोत्साहन भत्ता?

अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 8 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये तर 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये आणि 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. या प्रमाणे दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युइटी (एकरकमी आर्थिक सहाय्य) देण्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page