सिंधुदुर्ग ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय

फसवणुकीची रक्कम नुकसान भरपाई सहित ग्राहकाला परत करण्याचे बँकेला आदेश

कुडाळ प्रतिनिधी
शहरातील तुषार विजय वालावलकर हे एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांचे ग्राहक होते. असे असताना त्यांचे खात्यामधून एकंदरीत रक्कम रुपये 1,34,998/-एवढी रक्कम अज्ञात इसमाने तक्रारदारच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पद्धतीने तक्रारदाराच्या खात्यामधून सदरील रक्कम काढली होती. सदरील कामात तक्रारदार याला अचानक ऑनलाईन मेसेज आले आणि तक्रारदाराच्या खात्यामधून वरील रक्कम बजावत झाली सदरील घटना ही दिनांक 23/04/2022 ची होती त्यामुळे तक्रारदार याला एकंदरीत रक्कम रुपये 1,34,998/- एवढ्या रकमेचा आर्थिक भुरदंड झाला. वास्तविक पाहता तक्रारदार याने आपले खात्यामधून पैसे काढण्याची परवानगी कोणालाही दिली नव्हती, परंतु सदरील रक्कम शाखाधिकारी एचडीएफसी बँक कुडाळ यांच्या निष्काळजीपणाने हा भुरदंड तक्रारदार याला पडला. त्यानंतर रक्कम रुपये 25,000/- एवढी रक्कम तक्रारदार च्या खात्यात जमा झाली. परंतु रक्कम रुपये 1,14,996/- एवढी रक्कम तक्रारदाराच्या खात्यामधून अज्ञात इसमाने काढले त्यामुळे तक्रारदार याने तशा आशयाची नोटीस शाखाधिकारी एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांना दिली होती परंतु तरीसुद्धा कोणतेही दखल बँक यांनी घेतली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page