कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले ‘एआय’ प्रशिक्षण

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ चे प्रशिक्षण देण्यात आले शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुलभता कशी या माध्यमातून आणता येईल याचे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली यांनी दिले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कुडाळ नगरपंचायत ठरली आहे.

दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे आणि हे बदल आपल्या जीवनात सुद्धा घडत आहेत. तंत्रज्ञानामधील नवीन एआय अध्याय सुरू झाला आहे. या माध्यमातून आपल्याला कोणत्याही कामकाजात सुलभता आणि गतिमानता निर्माण करता येते. ही गतिमानता शासकीय कामात येण्यासाठी एमकेसीएल व रोटरी क्लबच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, मुख्याधिकारी अरविंद नातू, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे, अमित वळंजू, राजू पवार तर हे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली व विघ्नेश खांडेकर यांनी दिले.

या प्रशिक्षणावेळी प्रणय तेली यांनी नगरपंचायतीच्या कामकाजामध्ये एआय चा वापर कशाप्रकारे होऊ शकतो आणि त्या माध्यमातून कामकाजाची गतिमानता वाढवता येईल याची माहिती दिली. तसेच हे कामकाज कसे सुलभपणे करता येईल याबाबतही माहिती दिली. कुडाळ नगरपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत ज्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page