आंबोली वनपरिक्षेत्र तील युवकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे:सरपंच सावित्री पालेकर
सावंतवाडी
तालुक्यातील
आंबोली वनक्षेत्रपाल सौ शिंदे च्या सूचनेनुसार आंबोली तील वनविश्राम गृह, फ़ॉरेस्ट गार्डन येथे निसर्ग पर्यटन गाईड शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंबोली परिक्षेत्र मध्ये आढळणारे फुलपाखरू बाबत हेमंत ओगले उभयचर व सरीसुप बाबत महादेव भिसे,पक्षी बाबत कु. भाग्यश्री परब,वनस्पती बाबत श्री राजेश देऊळकर मार्गदर्शन करणार आहेत
निसर्ग पर्यटन गाईड शिबीर च्या माध्यमातून जे प्रशिक्षण घेणार त्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देणार आहे.
निसर्ग पर्यटन गाईड शिबीर च्या माध्यमातून नवीन रोजगार ची संधी निर्माण होणार आहे.
प्रशिक्षण हे 12 व 13 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत असणार आहे.
आंबोली मध्ये फार मोठया प्रमाणात निसर्ग प्रेमी भेट देत असतात व त्यातुनच एक रोजगार ची नवीन संधी उपलब्ध होत आहे. त्याचा फायदा येथील युवकांना व्हावा या साठी सदर शिबीर महत्वाचे ठरणार आहे.
तरी वन परीक्षेत्र आंबोली च्या अत्यारितील युवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आव्हाहन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केले आहे.
