हुमरमळा (वालावल) गावातील महीला आक्रमक

नेरुर महीला प्रभाग समिती अध्यक्षा सोनाली चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून बचत गट राजीनामा देणार!

हुमरमळा गावात येऊन उमेद अधिकारी राठोड यांना सभा घेऊन तोडगा काढण्याचे गटविकास अधिकारी व्ही‌.बी.नाईक यांचे आश्वासन!

कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल गावातील सखी महीला संघाची सर्व साधारण सभा दुपारी अडीच वाजता आयोजित केली होती परंतु प्रभाग समिती अध्यक्षा संध्याकाळी ४ वाजता आल्या त्या वेळी महीलांसाठी ग्रामपंचायतीने आरोग्य शिबीर आयोजित केले त्या आरोग्य शिबीर कार्यक्रम पाहीला आणि सौ चव्हाण संतापल्या हा काय तमाशा लावला आणि उपस्थित कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग आणि फोटो मारले आणि उपस्थित सखी महीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या वर तावातावाने बोलुन निघुन गेल्या या वादाची ठिणगी पडुन आज हुमरमळा वालावल गावातील सी आर पी व सखि महीला संघाच्या सर्व सदस्यांनी आज कुडाळ गटविकास अधिकारी आणि उमेदचे कार्यालय गाठुन सोनाली चव्हाण यांच्या कार्यपध्दतीचा पाढाच वाचला
यापुढे उमेदचे काम न करण्याचा निर्णय घेऊ.असे महीलांनी गटविकास अधिकारी व्ही बी नाईक यांची भेट घेऊन सांगीतले त्या नंतर उमेदच्या कुडाळ कार्यालयात या महीलांनी धडक दीली यावेळी उमेदचे अधिकारी श्री राठोड हे ट्रेनिंगसाठी गेल्याने भेट होऊ शकली नाही
यावेळी गटविकास अधिकारी श्री नाईक यांनी सांगितले गावातच महीला सभा घेऊन तोडगा काढु असे आश्वासन दिले
यावेळी माजी सरपंच सौ अर्चना बंगे, सी आर पी हीताली गुंजकर, सि आर पी मानसी वालावलकर , सोनाली मांजरेकर, रुपाली परब, हेमांगी कद्रेकर, दर्शना मार्गि, भारती परब,सौ माड्ये, सौ परकर, सौ राणे, कु ताम्हाणेकर व महीला उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page