व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एम.एस. ए.टी.विभागात अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

बांदा :
व्ही.एन.नाबर स्कूल बांदा या शाळेत इयत्ता आठवी ते दहावी मधील मुलांना तंत्रशिक्षण शिकण्यास मिळत आहे हे या शाळेतील विद्यार्थ्यांचे खरचं भाग्य आहे. बांदा परिसरातील कोणत्याही माध्यमिक शाळेत अशा प्रकारचा तंत्रशिक्षण विषय शिकवले जात नाही पुढे इंजिनिअरिंग कडे जाणा-या विद्यार्थ्यांना यांचा मोठा फायदा आहे असे मत मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एम.एस.ए.टी विभागाच्या स्वागत कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, जेष्ठ निदेशिका सौ. रिया देसाई, सौ. गायत्री देसाई, समन्वयक राकेश परब, निदेशक भुषण सावंत उपस्थित होते.
मनाली देसाई पुढे म्हणाल्या या प्रशाळेमध्ये एस.एस.ए.टी हा विषय सन २००५ पासून शिकवला जात आहे. या
विषयामुळेच या प्रशाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंग कडे गेले आहेत. खरचं हे खूप कौतुकास्पद
असल्याचे त्यांनी सांगितले.
एम.एस.ए.टी विभागातील चार ही विभागाची सविस्तर माहिती समन्वयक राकेश परब
यांनी देत एम.एस.ए. टी. विभागात आलेल्या आठवी मधील विद्याथ्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका,निदेशिका यांच्या हस्ते आठवी मधील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत
करण्यात आले. यावेळी निदेशक भूषण सावंत, राकेश परब, गायत्री देसाई, इयत्ता आठवी मधील विद्यार्थीं व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. तसेच शाळेत इयत्ता नर्सरी ते पाचवी मधील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्री. राकेश परब तर आभार सौ.गायत्री देसाई
हीने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page