कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

नगरसेवक उदय मांजरेकर यांची मागणी

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी मोकाट जनावरे गाय, बैल रस्त्यांवर मुक्तपणे फिरत असून नगरपंचायत हद्दीमध्ये चालू आठवड्यामध्ये मोकाट जनावरांमुळे दोन ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडून आले आहेत. सदर मोकाट फिरणा-या जनावरांमुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेस तसेच स्वच्छतेस धोका निर्माण झाला आहे. तसेच या जनावरांमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण साचत असून आजार फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. ही मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात यावी तसेच अशा जनावरांना पकडून सुरक्षित गोठ्यांमध्ये ठेवण्यात यावे. संबंधित जनावरांचे मालक सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. कुडाळ शहरात जनजागृतीसाठी प्रचार व सूचना फलक लावण्यात यावेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने या जनावरांचे आरोग्य तपासण्यात यावे. याची गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याबाबबतचे लेखी पत्र कुडाळ नगरपंच्यायत चे नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देत नगरसेवक उदय मांजरेकर यांनी सादर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page