कुडाळ प्रतिनिधी
भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिनांक 17 सप्टेंबर रोजी असून, त्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर 2025 (मा. पंतप्रधान यांचा वाढदिवस) ते 2 ऑक्टोबर 2025 (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
सदर सेवा पंधरवड्याच्या कालावधीत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या कुडाळ मंडलामार्फत करण्यात येणार आहे. या सेवा उपक्रमांच्या यशस्वी नियोजनासाठी कार्यशाळा आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी कुडाळ भाजपा कार्यालय येथे संपन्न झाली.
सदर कार्यशाळेस भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई, राज्य परिषद सदस्य श्री. राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष श्री. बंडया सावंत, उपाध्यक्ष सौ. संध्या तेर्से मॅडम,सरचिटणीस सौ. अदिती सावंत, मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, मंडल संयोजक श्री. भाई बेळणेकर, सरचिटणीस श्री. रुपेश कानडे, शहर अध्यक्ष सुनिल बांदेकर, मुक्ती परब,तसेच शक्ती केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत सेवा पंधरवड्यादरम्यान राबवायच्या विविध सेवा उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा व विचारविनिमय झाला. कुडाळ मंडल मधील सर्व 93 बूथवर या अभियानासाठी प्रत्येकी एका पदाधिकाऱ्याकडे बूथनिहाय जबाबदारी देण्याचे निश्चित करण्यात आले.
जिल्हा नियोजन मधून कुडाळ मंडल मध्ये विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री सन्मा. नितेशजी राणेसाहेब, जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
