जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

कुडाळ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार,कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) १६ जानेवारी २०२६ पासून स्वीकारले जाणार आहेत.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

अर्ज सादर करण्याचा तपशील :

कालावधीः १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार) ते २१ जानेवारी २०२६ (बुधवार).

वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत.

१८ जानेवारी (रविवार) रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ठिकाण: तहसीलदार कार्यालय कुडाळ, तळमजला (तहसीलदार दालन).

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे कडक नियमावली लागू केली आहे:

१. वाहनांची मर्यादाः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या

उमेदवारासोबत जास्तीत जास्त २ वाहनांनाच परवानगी असेल.

२. प्रवेश मर्यादाः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारासह केवळ ४ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.

३. १०० मीटर परिसर प्रतिबंधितः निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात असेल. या परिसरात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत कोणतीही खाजगी प्रतिष्ठाने/दुकानं सुरू ठेवता येणार नाहीत.

४. नागरिकांना आवाहनः अत्यावश्यक काम नसल्यास नागरिकांनी या काळात निवडणूक कार्यालयाकडे येणे टाळावे. ज्यांना काम आहे, त्यांनी आपली वाहने पोलीस विभागाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्रातच उभी करावीत.

५. CCTV ची नजरः संपूर्ण कार्यालय परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

६. रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय आपत्कालीन सेवांना या निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली वाहने पार्किंग क्षेत्रात उभी करून रुग्णालयात जावे.

असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page