सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट )पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत तिकीट वाटपात अक्षता लावण्यात आली.
जिल्हातील पदाधिकारी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती झाल्याचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर केले व महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव आल्यास त्यांना ही विचार करून योग्य जागा दिल्या जातील असे पत्रकार परिषदेत खा.राणे साहेबांनी जाहीर केले मात्र प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याला तिकीट वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी नाराज होऊन वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.अशी महायुतीमधील नाराजी ‘खबरदार कोकण न्यूज’ ला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
