सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी आज तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल केला.
“विकासाची नवी पहाट, कमळाचा नवा निर्धार” अशा घोषणा देत गावडेंनी निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे उडी घेतली आहे.
मिरवणुकीने वेधले लक्षः
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सावंतवाडी गोदाम परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि भाजपच्या झेंड्यांनी परिसर भगवामय झाला होता.
कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता संदीप गावडेंनी या मतदारसंघात आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले.
यावेळी संदीप गावडे यांच्या समर्थनार्थ भाजपचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर, युवा नेते विनोद राऊळ, युवा नेते विशाल परब यांसह भाजपचे सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप गावडे यांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गावडे यांनी विश्वास व्यक्त केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे मतदारसंघात विकासाची कामे तळागाळापर्यंत पोहचवली आहे
