शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कुडाळ येथे जयंती साजरी..

कुडाळ (प्रतिनिधी)

कुडाळ येथे आज शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

येथील शिंदे शिवसेना महायुती कार्यालयात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते व काका कुडाळकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, सागर वालावलकर, संजय भोगटे, रोहीत भोगटे, प्रसन्ना गंगावणे, राजवीर पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page