कवठणी येथील श्री देव काजरोबा जत्रोत्सवात भाजपा युवानेते विशाल परब यांनी घेतले दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी
सातार्डा पंचक्रोशीतील कवठणी गावची प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव काजरोबा देवाची जत्रा काल मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात भाजपा युवानेते विशालजी परब यांनी उपस्थित राहून देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि श्री चरणी नतमस्तक झाले.

कवठणी येथील श्री देव काजरोबाची जत्रा ही विशेषतः ‘केळीच्या घडाच्या नवसाची जत्रा’ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक येथे मोठ्या श्रद्धेने केळीचे घड अर्पण करतात. काल पार पडलेल्या या जत्रेत दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी त्यांच्यासोबत गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेखर गांवकर,साई कवठणकर,राजू रेगे,यामेश्वर कवठणकर
,यश कवठणकर,मयूर रेडकर,अजित कवठणकर,नितीन नाईक,अर्जुन कवठणकर,वासुदेव मालवणकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page