जिल्ह्यातील धनगर समाजाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली “समाज भवन” उभारणी ची मागणी मार्गी लागण्याची शक्यता..

राजेश वरक (गोठोस) यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाची ५ एप्रिल ला कुडाळ येथे महत्त्वाची विशेष बैठक..

कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली ‘समाज भवन’ उभारणीची मागणी आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक २:३० वाजता कुडाळ एमआयडीसी (MIDC) येथील शासकीय विश्रामगृहात येथे समाज बांधवांच्या मागणीसाठी राजेश वरक (गोठोस) यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे

गेल्या काही वर्षांत धनगर समाज मोठ्या प्रमाणावर शिक्षित झाला असून मुख्य प्रवाहात सामील झाला आहे. सोशल मीडियाच्या, विशेषतः व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विचारांचे आदान-प्रदान करणे सोपे झाले आहे. याच उद्देशाने महिनाभरापूर्वी एक विशेष ग्रुप तयार करण्यात आला होता, ज्याला समाजातील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाज भवनाच्या उभारणीसाठी एकत्रित सभा घेण्याची मागणी समाज बांधवांनी लावून धरली होती, त्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीत समाज भवनासाठी जागेचा शोध, पुढाकार आणि नियोजित कृती आराखडा यावर विचारविनिमय केला जाणार आहे. तरी या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतील आणि स्तरांतील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन राजेश वरक (गोठोस) यांनी केले आहे. धनगर समाज भवन उभारणीबाबत विचारविनिमय करण्यासाठी रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता शासकीय विश्रामगृह, कुडाळ (MIDC) येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page