एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये- वैभव नाईक

अनधिकृत धंदे करणारे स्थानिक आमदारांचे निकटवर्तिय- परशुराम उपरकर

कणकवली प्रतिनिधी
एल.ई.डी. मासेमारीला संपूर्ण देशात बंदी असूनही मालवण येथे गेले अनेक दिवस बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारी राजरोस सुरु आहे. पारंपरिक मच्छीमारांनी यावर वारंवार तक्रारी करूनही राज्य सरकार, जिल्ह्यातील सत्ताधारी आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारीवर कोणतीही कारवाई केली जात नाही. पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय करून एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्यांना सत्ताधारी अभय देत आहेत. त्याचबरोबर मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलमध्ये देखील दरवाढ करून मच्छीमारांना आर्थिक संकटात लोटले आहे. त्यामुळे राज्य सरकार, मग्रूर झालेले जिल्ह्यातील सत्ताधारी आणि मस्त्य अधिकारी यांच्या विरोधात मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मत्स्य अधिकाऱ्यांसमोर मागण्या मांडण्यात आल्या.या मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

याप्रसंगी एल.ई.डी. बोट धारकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो! एल.ई.डी. हटाव समुद्र बचाव! मच्छिमारांना सवलतीच्या दराने डिझेल मिळालेच पाहिजे! एल.ई.डी. मच्छिमारी बंद झालीच पाहिजे. एल.ई.डी. मच्छिमारी बंद करा नाहीतर खुर्च्या खाली करा! मच्छीमार एकजुटीचा विजय असो! मत्स्य मंत्री तुपाशी मच्छीमार बांधव उपाशी! अशा अनेक घोषणा देत तशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी,महेश जावकर, मच्छीमार नेते मिथुन मालंडकर, मालवण श्रमिक मच्छीमार संघटना आणि श्रमजीवी रापणकर संघ मच्छीमार नेते छोटू सावजी, मच्छीमार नेते दिलीप घारे, आनंदवाडी मच्छीमार नेते विष्णू धुरत, युवा मच्छीमार नेते मोहित गिरप, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत नगरसेवक तपस्वी मयेकर,नगरसेवीका अनिता गिरकर, शिवसेना महिला आघाडी संघटक दिपाली शिंदे, माजी नगरसेविका पूजा करलकर,गौरी मयेकर, राधिका मोंडकर, उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, उपशहरप्रमुख गौरव वेर्लेकर, राका रोगे, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, मच्छीमार नेते नारायण कुबल,अन्वय प्रभू, माधुरी प्रभू, सूर्वी लोणे, संजना रेडकर,महेश देसाई, जेम्स फर्नांडिस,स्वप्नील आचरेकर, गणपत आडिवरेकर, किशोर गावकर, सचिन रेडकर, जयराम घाडी, भाऊ परब, विभागप्रमुख समीर लब्दे, विजय पालव, पपू परुळेकर,अमित फोंडके, बाबा पास्कोल, अमोल वस्त, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, आयवान फर्नांडिस,आनंद चिरमुले,मयूर करंगुटकर, समीर लाड, महिला विभागप्रमुख लता खोत, पूजा जोगी, पिंकू फर्नांडिस, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, चंदू खोबरेकर, जयदेव लोणे, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रसाद दळवी, रुपेश पिळणकर, गौरव दळवी, संतोष मांजरेकर, दीपक चव्हाण, संतोष दळवी, दौलत दळवी, अनिल तळगावकर, विश्वास आचरेकर, प्रवीण सावंत, विजय घाडीगावकर, चंद्रकांत मिठबावकर, बाळा परब, परेश तारी, ऋषी मसुरकर, श्रीकांत बागवे, परेश तारी, रमेश कद्रेकर, राजू मेस्त्री, वायरी सरपंच भगवान लुडबे, मंदार आडकर, बबलू तारी रोहन कुमटेकर,मनीष भगत, गणेश चोपडेकर, बटेश हूर्णेकर,देवानंद मोंडकर,पपी तोडणकर,तेजस तारी बाबी तारी, नाना ढोके, अनंत खोबरेकर, निलेश तारी, अपी धुरी, हेमंत जोशी, ओमकार खोजे,अरुण परब, चंदा जोशी, ललित वेंगुर्लेकर, वासू कोळबकर, विजय खडपकर, पुंडलिक खोरजे,प्रकाश केरकर,वासू गावकर, बाळकृष्ण कोळंबकर, महेश सावंत,दिलीप मंणचेकर,दाजी जोगी, वृषाली तारी, निकिता धुरी, सिद्धी धुरी, नरेश चैतन्य,तारीख केरकर,यतीन आचरेकर, भूषण आचरेकर, गोविंद तोडणकर,शैलेश मोंडकर, गणेश मसुरकर,योगेश आचरेकर,निलेश दुधवडकर, रोहित ढोके, विकी तोडणकर,आल्बेट रॉड्रिक्स, डॉमनेट डिसोजा, विली ब्रीद, मिनिंन फर्नांडिस, मनवेल फर्नांडिस, पास्को ब्रीद,संतोष गोरवले, श्याम घाडी, द्वारकानाथ पेडणेकर, पश्या देसाई,सचिन बागवे, मिथुन माळगावकर, संजू सावंत, रंजन प्रभू, पुष्पक घाडी, नारायण परब, दिलीप पुजारे, दत्तराज तोंडवळकर आदी मच्छीमार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page